मुंबईचा पारा 34 डिग्री वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईचे कमाल तापमान गुरुवारी 34 डिग्री सेल्सिअस इतके नोंदले गेले, बरोबरच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून कुलाबा येथे गुरुवारी 74% तर सांताक्रुज येथे 87% आर्द्रता नोंदली गेली. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारला आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसात आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वीज आणि वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणा-या अॅक्यूवेदरने येत्या 19 एप्रिलपर्यंत मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असे सांगितले आहे, तसेच किमान तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.