मालाडमध्ये बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू

53
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। मुंबई

मालाड येथे बस अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. ममता निषाद परब असे तिचे नाव आहे. अपघातप्रकरणी मालवणी पोलिसांनी बेस्ट बसचालकाला अटक केली.

ममता ही मढ परिसरात राहत होती. आज सकाळी ती पतीसोबत मोटरसायकलने मालाडला जात होती. मढच्या आईस फॅक्टरीजवळ त्याची मोटरसायकल आली. तेव्हा एका बाइकस्वाराने त्याच्या मोटरसायकलला कट मारली. कट मारल्यामुळे ममता खाली पडली. दरम्यान, समोरून आलेल्या 269 क्रमांकाच्या बसच्या चाकाखाली आल्यामुळे ममता गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती कळताच मालवणी पोलीस घटनास्थळी गेले. तिला उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले. तेथे तिचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी पोलिसांनी बसचालक पोपट सावंत विरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या