
मुंबईतील खार सबवेजवळ येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करणाऱ्या विकृताला सतर्क नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. तरुणाला रंगेहात पकडत आधी चोप देण्यात आला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वराह वॉरिअर नावाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ सत्य घटनेवर आधारित असून हा सर्व प्रकार माझ्या डोळ्यांदेखत घडला आहे. मी खार सबवे जवळून पायी जात असताना रस्त्याच्या कडेला कामासाठी मुंबईत आलेला एक उत्तर प्रदेशचा तरुण उभा होता. त्याच्या हातामध्ये फोन होता आणि तो काहीतरी रेकॉर्ड करत असल्याचे वाटत होते, असे हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.
हा विकृत तरुण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ चित्रित करत होता. मी त्याला हटकले, जाब विचारला आणि त्याच्या कानशिलातही लगावली. त्यानंतर माझ्याकडे असलेले सर्व पुरावे घेतले आणि त्याला ओढत खार पोलीस स्थानकात नेऊन पोलिसांच्या हवाली केले, असेही त्याने नमूद केले.
This video is all about a real incident happened in front of me. I was walking by a road (Khar Subway) and there was a UP guy (who was migrated in Mumbai for work) standing beside the road with a phone in his hand like he is recording something.
This cheap guy was taking videos… pic.twitter.com/1QxHhNdQRc
— VARAHA WARRIOR (@VarahaWarrior) March 7, 2026




















































