मराठा आरक्षण राज्य सरकारचा आज हायकोर्टात युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱया विविध याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. आरक्षणाला विरोध करणाऱया याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद मंगळवारी संपला असून बुधवारी मराठय़ांना आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात बाजू मांडणार आहेत. मराठा समाजाला राज्य सरकारने आर्थिक व शैक्षणिक मागासप्रवर्गाअंतर्गत 16 टक्के आरक्षण देण्याचा कायदा तयार केला आहे. या आरक्षणाला विरोध करणाऱया तर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थही न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.