मुनव्वर फारुखीला संपविण्याचा होता प्लॅन, दिल्ली पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याची सुपारी घेतलेल्या दोघांना रोहित गोदारा आणि गोल्डी बराड गॅंगमधील दोन सदस्यांना अटक केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि साहिल अशी दोन्ही आरोपींची ओळख पटली आहे. दोन्ही आरोपी हरियाणातील पानीपत आणि भिवानी येथील रहिवासी आहेत. रोहीत गोदारा गोल्डी बराड आणि विरेंद्र चरण यांच्यासोबत काम करतात. या तिघांनी मुन्नावर फारुखीला मारण्याची साहिल आणि राहुल यांना सुपारी दिली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांच्या आधीच मुसक्या आवळल्या.

दोन्ही शूटरबाबात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 2024 मध्ये दिल्ली पोलिसांना मुन्नावर फारुखीच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर मुनव्वरला दिल्लीतून मुंबईला पाठविण्यात आले होते. तसेच मुनव्वरला लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडूनही जीवाला धोका आहे.