
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनमार्फत कामगारांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळय़ाला शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कामगारांच्या गुणवंत पाल्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
शिवसेना भवन सभागृहात आयोजित या सोहळय़ात संघटनेच्या सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल, उपाध्यक्षा संजय कांबळे-बापेरकर, चिटणीस संजय वाघ, कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सत्यवान जावकर, चिटणीस हेमंत कदम, अजय राऊत, अतुल केरकर, महेश गुरव, संदीप तांबे, वृषाली परुळेकर, मंगल तावडे, शिल्पा पोवार, रंजना नेवाळकर उपस्थित होते.