बारच्या पाण्याच्या टाकीत दोन कामगारांचे मृतदेह; मीरा रोड येथील हत्याकांड

777
file photo

मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंट कम बारमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना उघड झाली आहे. लॉकडाउनमुळे बंद असलेल्या बारच्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत मध्यरात्रीनंतर 1 वाजता दोन मृतदेह आढळून आले आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचेच मृतदेह असून त्याची हत्या कोणी आणि का केली याचा उलगडा झालेला नाही.

मीरा रोड येथील शितलनगर परिसरात शबरी बार अॅण्ड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलचे मालक गंगाधरन यांना मध्यरात्री एक वाजता ओळखीच्या नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने हॉटेलमध्ये दोन व्यक्तींचा खून झाला आहे आणि त्यांचे मृतदेह हॉटेलच्या पाण्याच्या टाकीत आहेत अशी माहिती दिली. गंगाधरन यांनी तात्काळ या घटनेची माहिती मीरा रोड पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार मीरा रोड विभागाचे पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

मृत तरुणाच्या मोबाईलचा वापर
हत्याकांड तीनचार दिवसांपूर्वी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गंगाधरन यांना ज्या क्रमांकावरून फोन आला होता तो फोन हत्या झालेल्यांपैकी एकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच लॉकडाउनमुळे हॉटेल बंद असले तरी येथे हॉटेलचे कर्मचारी वास्तव्य करत आहेत, अशी माहिती हॉटेल मालकाने पोलिसांना दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या