
नागपूर- रामटेक तालुक्यातील देवलापार येथून जवळच असलेल्या वडांबा येथील रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल (वय 53 वर्षे) यांची आज पहाटेच्या सुमारास निर्घुण हत्या करण्यात आली. ही घटना पहाटे चार ते पाचच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वडांबा येथील रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल यांचा नागपूर जबलपूर महामार्गावर ढाबा आहे. प्रकाश नेहमीप्रमाणे रात्री ढाब्यावर आले. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अज्यात इसमाने त्याची हत्या करून पळ काढला. यावेळी ढाब्यावर प्रकाश व्यतिरिक्त दोन नोकर व नजीकच्या वीटभट्यावर काम करण्याकरिता असलेले दोन तीन मजूर होते. प्रकाशच्या गालावर मोठी जखम आहे.
प्रकाश जैस्वाल यांची पहिली पत्नी व दोन मुले आहेत त्यांचे प्रकाश सोबत पटत नसल्याने ते नागपुरला राहायचे. प्रकाशने दुसरी पत्नी केली होती. प्रकाश तिच्यासोबत वडांबा येथे राहायचे. ढाब्यावर जे दोन नोकर होते त्यातील एक त्याच्या दुसऱ्या पत्नीचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते.
या घटनेची माहिती प्रकाश नोकराने घरी जाऊन त्याचा लहान भाऊ पप्पूला दिली. जवळपास सकाळी पाचच्या सुमारास पप्पू ढाब्यावर आला व त्याने याची माहिती गावातील चमन जैस्वाल यांना दिली. त्यानी पोलिसांना माहिती देताच देवलापार पोलीस घटनास्थळी पोहोचले.




























































