
सामना प्रतिनिधी । गेवराई
दारू पित असताना झालेल्या किरकोळ भांडणाच्या वादातून मेव्हण्याला वाचवायला गेलेल्या एकाचा आरोपीने कत्तीने वार करून खून केल्याची घटना शहरातील संजय नगर भागात बुधवार रोजी रात्री 12 च्या सुमारास घडली असुन आरोपीला गेवराई पोलीसांनी अवघ्या 6 तासात अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश जाधव व विनोद जोगदंड दोघे राहणार शिवाजी नगर गेवराई हे पार्टी करायला गेले मात्र दारू घेत असतांना आकाश व विनोदमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यानंतर आकाश हॉटेल बाहेर आला असता विनोद जोगदंड बियरची रिकामी बाटली घेवून बाहेर आला व त्याने आकाशच्या डोक्यात बाटली मारली व निघून गेला. त्यानंतर विजय जोगदंड आकाशच्या घराकडे आला व माझे काही चुकले असेल तर मला माफ कर असे म्हणत त्याने अचानक कत्ती काढुन आकाशवर वार केला. तेवढ्यात आकाशचा मेव्हणा सचिन हरिभाऊ गायकवाड (26) मेव्हण्याला वाचवायला पुढे येताच विजयने सचिनलाच वार करून ठार मारले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































