पाणंद रस्त्याच्या वादातून येळणूरमध्ये एकाची हत्या; आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणंद रस्ता तयार करण्यावरून एकाला काठ्या कुऱ्हाडीने मारहाण करुन हत्या केल्याची घटना निलंगा तालुक्यातील येळणूर येथे घडली आहे.निलंगा तालुक्यातील येळणूर येथे शेतासाठी पाणंद रस्ता तयार करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून काठ्या कुऱ्हाडीने मारहाण करून एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे.

संबंधित शेतकऱ्याच्या गावनकाशावर रस्ता नसतानाही संबंधित शेतकऱ्याच्या शेतातून जबरदस्तीने रस्ता टाकल्याच्या वादातून एकाचा खून झाला आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात पाणंद रस्ता करण्यावरून वाद झाला. यात शेतकरी अनिल तातेराव सोळुंके (वय 50) यांना गावातील काही तरुणांनी पाणंद रस्ता का करु देत नाहीस म्हणून गंभीर मारहाण केली. यात सोळुंके यांचा मृत्यू झाला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. याबाबतची माहिती औराद शहाजानी पोलिसांना कळताच गावात पोलीस दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली.