हिंदी मालिकांमध्ये गाजतोय मराठमोळा संगीतकार देवेंद्र भोमे

गेल्या दहा वर्षांपासून हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिका विश्वात संगीतकार म्हणून देवेंद्र भोमे याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देवेंद्रने संगीतबद्ध केलेल्या सोनी वाहिनीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ आणि ‘मेरे साई’ या दोन मालिका घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. देवेंद्रने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’साठी काही नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत.

महाराष्ट्राबाहेरही अहिल्याबाईंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरच्या रसिकांचा विचार करून त्याने संगीत दिले आहे. हे करताना अहिल्याबाईंचे मराठीशी असलेले नाते तुटू न देण्याचे आव्हान आपल्यासमोर होते असे तो सांगतो. फोक आणि क्लासिकलचे मॅश अप केलेले संगीत या मालिकेला दिले.

टायटल ट्रॅक, लग्न गीत आणि कथाप्रवाहात येणाऱ्या प्रसंगानुसार संगीत देण्याचे काम मी करतोय असे त्याने सांगितले. याखेरीज देवेंद्रने ‘कौन बनेगा करोडपती’च्या अकराव्या पर्वातील अंतिम फेरी, ‘कथा कॉटेज’मधील ‘पटियाला बेब्स’, ‘इंडियावाली माँ’, ‘महाबली हनुमान’, ‘गर्जा महाराष्ट्र’, ‘सावित्रीज्योती’, ‘छोटी मालकीन’साठीदेखील संगीत दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या