गुरुदत्त यांच्या चित्रपट गीतांवर सांगीतिक मैफल

संवेदनशील दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांचा स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून रविवार, 19 ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रात्री 8.30 वाजता त्यांच्या चित्रपट गीतांवर आधारित ‘जाने क्या तूने कही’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सरिता राजेश, सौम्या वर्मा आणि सर्वेश मिश्रा हे गुरुदत्त यांच्याकर चित्रीत केलेली गीते सादर करतील. त्यांना रिधीम लाड व सहकारी कोरस साथ करतील. संगीत संयोजन ओंकार देवासकर यांचे आहे. अमित काकडे हे निवेदन करतील. ध्वनी व्यवस्था बाबू शेटगे यांची आहे.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या मैफलीचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संगीत रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिक डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चकरे यांनी केले आहे.