सुलतान आला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरच्या गोरेवाडा केंद्रात बंदिस्त असणारा सुलतान (सी-1) हा वाघ अखेर 800 किमीचा प्रवास करत गुरुवारी सकाळी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाला. वाघांच्या प्रजनन काळात त्यांच्या गुणसूत्र गुणधर्मात बदल व्हावा यासाठी सुलतानला मुंबईत आणण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधीक्षक विजय बारब्दे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सुलतानला नागपुरातून मुंबईत आणले. सद्यस्थितीत सुलतानला उद्यानातील व्याघ्रविहारात ठेवण्यात आले आहे.