नगर शहरामध्ये सात दुकाने आगीत जळून भस्मसात

1607

नगर शहरातील कायनेटिक चौक परिसरामध्ये असलेल्या एका भंगार दुकानाला गुरुवारी अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची दाहकता एवढी मोठी होती की आजू बाजूची सहा ते सात दुकाने या आगीमध्ये भस्मसात झाली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासह इतर अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी रवाना झाले आहे.

नगर पुणे महामार्गावर असलेल्या कायनेटिक चौकाजवळ एक भंगाराचे दुकान आहे. सायंकाळी साडे सातच्या सुमाराला याला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचा भडका एवढा मोठा होता की आजूबाजूच्या पाच ते सहा दुकाने आगीमध्ये जळून भस्मसात झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.  यासंदर्भात विभागाचे प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता आग विझविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या