नगर जिल्ह्यातील 4 ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून घोषित

1584

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मुकूंदनगर (नगर शहर), आलमगीर (नगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर हे क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदू पासून जवळपास 2 कि.मी.चा परिसर हा कोरोनाग्रस्त क्षेत्राचा मुख्य भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री इत्यादी दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये -जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या