कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

23

सामना प्रतिनिधी। नगर

कर्जाची रक्कम फेडणे शक्य नसल्याने नगर तालुक्यातील देवळगांव सिध्दी येथे एका शेतकऱ्याने गोठयात घरात गळफास लावून आत्महत्या केली. राहणारे भाऊसाहेब गंगाराम गिरवले ( 65) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गिरवले हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले हेाते. देवळगाव सिध्दी येथे त्यांची शेती आहे. निवृत्तीनंतर ते शेतीचे काम करत होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्थांकडून कर्ज घेतले होते. पण त्याची परतफेड करणे शक्य नसल्याने त्यांनी घराशेजारील गोठ्याच्या छपराला गळफास लावून आत्महत्या केली . सकाळी गिरवले घरात नसल्याचे लक्षात आल्यावर घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी घराशेजारील गोठ्यात गळफास लावेल्या अवस्थेत गिरवले यांचा मृतदेह आढळला.

आपली प्रतिक्रिया द्या