नगर पुणे महामार्गावर वाळूच्या डंपरचा अपघात

आज दुपारी (दि. 31 मे) नगर पुणे महामार्गावर असलेल्या रेल्वेच्या पुलाचा कठडा तोडून वाळूचा डंपर खाली पडला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नगर पुणे महामार्गावर कायनेटिक चौकजवळील हा रेल्वेचा पूल ब्रिटिश काळापासून आहे. दुपारच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले, आणि तो बाजूच्या कठड्यावर जाऊन आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की टेम्पो पूलाचा कठडा तोडून बाजूच्या जिन्यावर जाऊन पडला.

रस्त्यावर वरजळ असल्याने घडलेला प्रकार लगेचच कोतवाली पोलिस ठाण्यात कळवण्यात आला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघातामुळे वाहतुकीला झालेला अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.