नगर – आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करणार्‍या टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करणार्‍या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपीमध्ये सचिन नेमजी काळे आणि हरीभाऊ नेमजी काळे या दोघांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी फिर्यादी रविंद्र भाऊसाहेब गागरे हे लोणी बाजारात बाजार करत असताना त्यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल काही अज्ञात इसमांनी चोराला. यानंतर त्यांनी पोलसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे.