
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्रात औषधांचा तुटवडा होत आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे औषधांचा तुटवडा होत असल्याबाबत नागोठणे येथील ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे यांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे लेखी तक्रार मांडली. याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेतली व उपसभापती कार्यालय विशेष कार्यकारी अधिकारी यांना पाठपुरावा करण्यासाठी सूचना दिली. याबाबत स्थानिक औषध प्रशासनांशी संपर्क करून औषध तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनास दिली. यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवून आज औषध पुरवठा उपलब्ध करून दिला.
मुंबई व महाराष्ट्र मध्ये डायबेटीस आणि ब्लडप्रेशरचे औषध तुटवडा असल्याबाबत वृत्त आहे. ठराविक कंपनीचे औषध जरी उपलब्ध नसले तरी देखील याचा आजारावर परिणामकारक औषध शासकीय रुग्णालयात उपलब्ध असल्याचे उपसभापती कार्यालयाने चौकशी केल्यास औषध प्रशासन अधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासकीय रुग्णालयातुन डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यावे अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली
























































