राममंदिराचे श्रेय सर्वांचे; कुणा एका पक्षाचे नाही – शिवसेना

513
sanjay-raut

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर उभारले जावे ही जगभरातल्या हिंदुस्थानी नागरीकांची कित्येक दशकांपासूनची भावना आहे. अयोध्येतील राममंदिराचा पायाभरणीचे काम शिवसेनेने केले आहे. मंदिर निर्माणाचे श्रेय सर्वांचे असून कुणा एका पक्षाचे नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

अयोध्येत गगनचुंबी राममंदिर उभारले जाईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले ते खरेच आहे. मंदिराच्या पायाभरणीत शिवसेनेचा सहभाग होता. लाखो-करोडो कारसेवकांचे मंदिर निर्माणाच्या कामात मोलाचे योगदान आहे. ज्यामध्ये विहिंप, साधू, संत, भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यामुळे अयोध्येत होणाऱ्या राममंदिराचे श्रेय कुणा एका पक्षाचे नाही. तर ते सर्वांनाच जात असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

…तर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली नसती
विरोधी पक्षनेते व त्यांच्ये सहकारी ‘सामना’चे फलक घेऊन विधान भवनात फिरत आहे याकडे पत्रकारांनी राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, हे आंदोलन नव्हे, तर स्टंटबाजी आहे. सत्तेत असताना त्यांनी ‘सामना’ वाचला असता तर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली नसती. शिवाय शेतकऱ्यांवर अन्याय झाला नसता, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात उद्रेक निर्माण झाला आहे. सर्वत्र अशांततेचं वातावरण आहे. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा चिंताजनक आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न देशात केंद्र सरकार करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या