नागपूर महापालिकेत कचरा घोटाळा

नागपूर शहरातून दररोज निघणाऱया कचरागाडीतून कचऱयाऐवजी माती, दगड निघाल्याची बाब आमदार विकास ठाकरे यांनी रविवारी (28 जून) केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाली. नागपूर महापालिकेत कचरा घोटाळा गाजणार आहे.

आमदार ठाकरे यांच्या मते, शहरातून गोळा केलेला कचरा भांडेवाडी यार्डमध्ये जमा केला जातो. येथे कचऱयाचे वजन पाहून रक्कम दिली जाते. मात्र, कचऱयाचे वजन वाढवून दाखविण्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबतची माहिती आमदार विकास ठाकरे यांना मिळाली. कचऱयाच्या गाडीत दगड व माती टापून शासनाची लूट करण्याचा प्रकार सुरू होता. आमदार ठाकरे व काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डात गाडय़ा अडवून गाडीतील कचरा रस्त्यावर ओतायला सुरुवात केली. त्यावेळी कचरा कमी अन् दगड, मातीचा ढीग रस्त्यावर जमा झाला. त्यामुळे कचरा घोटाळा होत असल्याचे उघडकीस आल़े. मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे डम्पिंग यार्डमध्ये मातीमिश्रित कचरागाडी खाली करण्यात येत असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला. मनपाच्या आरोग्य विभागाने यावर स्पष्टीकरण दिले असून कचरागाडीची दोनदा तपासणी होते.

आपली प्रतिक्रिया द्या