नागपुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपुरातील गड्डीगोदाम प्रभागाचे काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची रविवारी पहाटे दोन युवकांनी कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पूर्व वैमन्यसातून ही हत्या झाल्याचे समजते.

रविवारी सकाळी नागपुरातील भारत टॉकीज जवळ देवा उसरे एका टी स्टॉल वर चहा पित असतानाच ही घटना घडली आहे. मोटारसायकल वर आलेल्या दोन युवकांनी त्यांच्याजवळ असलेल्या कुऱ्हाड व तिक्ष्ण शस्त्रांनी देवा उसरे यांच्यावर सपासप वार केले.त्यानंतर हल्लेखोरांनी मोटारसायकल वरून पळ काढला. पण त्यांचा पाठलाग करून सदर पोलीसांच्या पथकाने त्यांना लगेचच ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. ज्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ते दोघे जण माजी नगरसेवक देवा उसरे यांचे शेजारीच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.