नागपुरात भर रस्त्यात एका जुगार अड्डा चालकाचा सिनेस्टाईल खून

प्रातिनिधिक फोटो

नागपूर -अमरावती रोडवर भर दिवसा भोले पेट्रोलपंपासमोर कुख्यात जुगार अड्डा चालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची भर पावसात सिनेस्टाईल खून झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एका बिअर बारमध्ये तलवारी नाचवून धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांची वरात पोलिसांनी काढली होती. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ही घटना घडली.

बाल्या बिनेकरचे गोळीबार चौकात सावजी भोजनालय असून तो जुगार अड्डाही चालवायचा. तो अमरावती रोडने निघाल्यापासून चार ते पाच आरोपी त्याच्या मागावर होते. भोले पेट्रोलपंप चौकात आरोपींनी बाल्याची कार थांबवून त्याच्यावर चाकू व कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात बाल्या जागीच ठार झाला. त्यानंतर आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या