औषधांसाठी पैसे नाहीत, नागपूरचे आजोबा रस्त्यांवर विकतायत पोहे  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर सध्या नागपूरमधील एका 70 वर्षीय आजोबांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. औषधोपचार आणि घरखर्च भागविण्यासाठी पैसे नसल्यामुळे या वयातही हे आजोबा रस्त्यावर पोहे, चणे, चिवडा विकताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओ पाहून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

एका व्हिडीओ ब्लॉगरने या आजोबांचा व्हिडीओ शेअर केला होता. जयंतीभाई असे या आजोबांचे नाव असून ते सायकलवर छोटी टोपली बांधून गांधीबाग, इतवारीच्या रस्त्यांवर सायंकाळी पोहे, चणे, चिवडा विकतात. त्यानंतर ते महाजनवाडी येथे सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात, अशी माहिती या व्हिडीओच्या पॅप्शनद्वारे देण्यात आली आहे. यासोबतच आजोबांचा संपर्क क्रमांक शेअर करून त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ अनेकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून आजोबांच्या मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत.