
नाईक मराठा मंडळ संस्थेचा शतक महोत्सवी सांगता सोहळा 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे पार पडणार आहे. या सोहळय़ात कृष्णराव केळुसकर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ‘पद्मविभूषण’ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ‘समाजभूषण प्रथम पुरस्कार’ व ‘आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. सोहळय़ाला ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप कबरे यांची मुलाखत होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह विख्यात सिव्हिल इंजिनीअर शरद वेंगुर्लेकर व संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्वाती गडकर आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे संयुक्त कार्यवाह किरण नाईक यांनी केले आहे.



























































