नायरला डोळय़ांच्या शस्त्रक्रियेसाठी आधुनिक मशीन

442

देशात पहिल्यांदाच रेटीनापासून मोतीबिंदूंपर्यंतच्या अनेक नेत्र शस्त्रक्रिया करणारी बहुउद्देशीय मशीन नायर रुग्णालयात दाखल झाली आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारची अनेक दृष्टीविकारांवर आधारित मशीन पालिकेच्या रुग्णालयात  दाखल झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नेत्रविकारांवर मोफत उपचार मिळणार आहेत.

पन्नासहून अधिक नेत्रविकारांवर आधारित शस्त्रक्रिया एकाच मशीनमध्ये होणार असल्याने नेत्रविकार असणाऱ्या रुग्णांना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसोबत राज्यातील रुग्णांना पालिकेच्या नायर रुग्णालयाचा मोठा आधार निर्माण झाला आहे अशी माहिती रुग्ण्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांनी दिली. देशातील खासगी रुग्णालयांमध्येही नेत्रविकारासाठीची ही मशीन अद्यापही उपलब्ध नसल्याचे डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले.ो

आपली प्रतिक्रिया द्या