
अन्याय, अत्याचार झालेल्या मुली आणि महिलांची नावे उघड करू नयेत असा कायदा आहे. पण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीच त्याची पायमल्ली करत पुण्याच्या कोथरूडमध्ये प्रकरणातील मुलीचे नावे आज सोशल मीडियावर जाहीर केली. त्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
कोथरुडमध्ये पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने मागासवर्गीय मुलींना अश्लील व जातिवाचक भाषा वापरली होती. तसेच बेकायदेशीरपणे त्यांच्या घरात घुसून झडती घेतली होती. त्या प्रकरणातील पीडित मुलीचे नाव आयोगाने जाहीर केले. भारतीय न्याय संहितेच्या कलम 72 नुसार हा गंभीर गुन्हा ठरतो. इतकेच नव्हे तर, महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी स्वतः हे ट्विट पुन्हा रिपोस्ट करून बेजबाबदारपणा दाखवून दिला. या प्रकरणी सरकारने चाकणकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत केली आहे.