
बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बस ट्रेकिंग मोबाईल ऍप सेवेत येणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईकर जनतेसाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोबाईल ऍपसाठी आकर्षक आणि सुयोग्य असे नाव बुधवार, 3 सप्टेंबर 2019 पर्यंत [email protected] या मेल आयडीवर आपण पाठवू शकता.
जनतेतून आलेल्या सर्व नावांमधून जे नाव बेस्ट उपक्रमाद्वारे निवडले जाईल, ते सुचविणाऱ्या नागरिकाला बक्षीस देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. या नव्या मोबाईल ऍपसाठी सुयोग्य आणि आकर्षक नाव सुचवावे, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. या मोबाईल ऍपमुळे बस थांब्यावर वाट पाहणाऱया प्रवाशांना बसची सद्यस्थिती समजणार आहे. नवी मुंबई आणि अहमदाबादमध्ये अशा प्रकारे बसची सद्यस्थिती मोबाईलवर समजते.


























































