भोकर राष्ट्रीय महामार्ग उपविभागात लाखोंचा डांबर घोटाळा

सामना प्रतिनिधी। नांदेड

राष्ट्रीय महामार्ग क्र.222 वरील रस्ता नूतनीकरणाच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. करारात कंपनीच्या बनावट पावत्या जोडून अन्य कंपनीचे डांबर वापरून कामं उरकले व शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे. तरी याप्रकरणी जी.जे. कंस्ट्रक्शन कं.नांदेड विरुद्ध भोकर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भोकर अंतर्गतच्या महामार्ग क्र.61 मधील क्र.565/00 ते 578/400 कि.मी. दरम्यानच्या रस्ता नूतनीकरणाचे काम जी.जे.कंस्ट्रक्शन कंपनी,गार्गी निवास,विसावा नगर,नांदेड या कंत्राटदारास दिले होते.सदरील काम सन 2014 ते 2015 दरम्यान पूर्ण करायचे होते.याच दरम्यान उपरोक्त कंत्राटदाराने कामाच्या करारात HPCL कंपनीचे डांबर वापरण्याचा करार केला होता.परंतू त्या कामात करार केलेल्या कंपनीचे डांबर न वापरता भलत्याच कंपनीच्या बनावट पावत्या वापरल्याचे लेखा परिक्षणात निदर्शनास आले.

या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भोकरचे उपविभागीय अभियंता नारायण दिगंबर कवठाळकर यांनी 23 एप्रिल 2019 रोजी भोकर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन जी.जे.कंस्ट्रक्शन कं.नांदेड विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्ह्याच्या फिर्यादीत नेमका किती रुपयाचा डांबर घोटाळा झाला हे नमूद करण्यात आलेले नाही.तसे लिहले नसल्याने नेमका किती रक्कमेचा हा डांबर घोटाळा झाला आहे ? हे विचारण्यासाठी संबंधीत अभियंत्यांना संपर्क साधला.परंतू संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे तपासणीक पो.नि.विकास पाटील यांना याबाबद विचारलो असता त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाअंती उपलब्ध कागदपत्रांवरुनच ती रक्कम किती ? हे सांगता येईल.असे सांगितले असून पुढील तपास पो.नि.विकास पाटील हे करत आहेत.