
धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसाठी आज दि.२० डिसेंबर रोजी मतदान सुरू आहे. शहरातील बन्नाळी भागातील एका मंगल कार्यालय येथे भाजप उमेदवार व कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न झाला. यासाठी शंभर ते दीडशे मतदार मंगल कार्यालयात आणण्यात आले. पैसे वाटताना गोंधळ झाल्याने मतदारांनी आम्हाला कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या मंगल कार्यालयात कोंडून ठेवलेल्या मतदारांना बाहेर काढले.
तसेच प्रभाग क्रमांक आठ मतदान केंद्रावर भाजपचे पुनम पवार व राष्ट्रवादीचे कैलास गोरठेकर व शिवराज पाटील होटाळकर हे आले असता उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली.






























































