
नांदेडमधील धर्माबाद मध्ये भारतीय जनता पक्ष व मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवून ईनानी मंगल कार्यालय व संत गोरोबा काका मंदिर येथे डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर शहरातील प्रभाग क्रमांक ९ च्या निवासी अपंग शाळा मतदान केंद्रावर दुपारी एक वाजता ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया बंद झाली होती. त्यानंतर प्रशासनाने दुसरी ईव्हीएम मशीन आणली त्यातही बिघाड झाल्याने प्रशासनाला तिसरी ईव्हीएम मशीन आणावी लागली. तिसरी मशीन आल्यानंतर आल्यानंतर मतदान सुरळीतपणे सुरू झाले. हा सर्व प्रकार तब्बल एक तास सुरू होता .त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान एक तास ताटकळत रांगेत उभे होते.






























































