नांदेड-नागपूर महामार्गाची बेकार अवस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नांदेड

नांदेड ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत बेकार झाली असून खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झालं आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून काही प्रवाशांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत खड्डे चुकवावे लागत आहेत.

कोणी खड्डयात पडतो तर कोणी चुकवताना पडतो,तर कोणी ब्रेक लावल्याने पाठीमागील वाहन त्याला येऊन धडकतो अशाच पद्धतीने या रस्त्यावर अपघात घडत आहेत. हा रस्ता चार पदरी रस्ता असला तरी खड्डे चुकविण्यासाठी एकाच पदराचा वापर होत आहे. खड्डे टाळण्यासाठी काहीजण विरूद्ध दिशेच्या रस्त्यावरून गाड्या हाकायला लागले आहेत. ज्यामुळे देखील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.