
सामना प्रतिनिधी । नांदेड
दरोड्याच्या तयारी असलेल्या पाच जणांना नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून त्यांच्याकडून शस्त्रासह काडतूसे जप्त केली होती. यावेळी काही आरोपी फरार झाले होते. या फरार आरोपीपैकी पुन्हा एकाला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेने कौठा परिसरातून मनप्रितसिंघ सुरजसिंघ अवलक याला ताब्यात घेतले आहे.
फरार असलेल्या गुन्हेगारांपैकी एक जण कौठा येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाहू, पोना. राजू पांगरीकर, बालाजी सातपूते, तानाजी येळगे यांच्या पथकाने दि.१७ ऑक्टोबर रोजी आठच्या सुमारास कौठा येथे चहा पित बसलेल्या फरार आरोपी मनप्रितसिंघ सुरजसिंघ अवलक याला ताब्यात घेतले.
































































