घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू

103
fire
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। अर्धापूर

येथील फुलेनगर भागातील एका घराला लागलेल्या आगीत एका ३५ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पाच वाजताच्या सुमारास घडली. मनिषा देविदास कऱ्हाळे असे तिचे नाव आहे.

मृत महिला आपला पती व दोन मुलांसह अर्धापूरात राहत होती. महालक्ष्मी सणानिमित्त ते सहकुटुंब चाभरा येथे गेले होते. मंगळवारी सकाळी ते घरी परतले. नित्याप्रमाणे देविदास कऱ्हाळे आपल्या गॅरेजवर गेले होते. तसेच मुलं शिकवणीला गेली होती. घरात केवळ त्यांची पत्नी होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत होत्या. दरम्यान अचानक स्वयंपाक खोलीत आग लागल्याने त्या जागीच होरपळून मृत्यूमुखी पडल्या. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. हि माहिती मिळताच सपोनि. महादेव मांजरमकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या