
मालवण तालुक्यातील नांदोसमधील गडकरीवाडा येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर नुकताच सुरू झाला. माता यशोदाचे प्रमुख श्रीकृष्ण हरचांदे यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात यश आले. कमी प्रवाहाने सुरू असलेला विद्युत पुरवठा अधिक प्रवाहाने सुरू झाल्यामुळे रत्नकांत काळसेकर, गुरुनाथ कदम, नंदू पार्टे, गणेश पार्टे, संतोष ठोंबरे, अजित नलावडे यांच्यासह सर्व वाडीतील ग्रामस्थांनी हरचांदे यांचे आभार मानले आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करण्यासाठी श्रीकृष्ण हरचांदे यांचे विशेष सहकार्य लाभले.




























































