
नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक सारंगखेडा यात्रा सुरू झाली आहे. चेतक महोत्सवासाठी देशभरातून विविध जातींचे आणि उमदे घोडे दाखल झाले आहेत.
यंदा विशेष आकर्षण ठरलेली ‘रुद्राणी’ ही घोडी पाहण्यासाठी अश्वप्रेमींची तुफान गर्दी होत आहे. तिला तब्बल 1 कोटी 17 लाख रुपये इतकी बोली लागली आहे. अश्व स्पर्धांमध्ये तब्बल 15 वेळेस विजेता ठरलेल्या पंजाबचे जगतारा सिंग यांचा हा ‘व्हाईट कोब्रा’ घोडा देखील आकर्षण ठरत आहे. सारंगखेडा अश्व बाजारात अवघ्या तीन दिवसांत 145 घोडय़ांची विक्री होऊन तब्बल 67 लाखांची उलाढाल झाली आहे.


























































