न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | संभाजीनगर

 मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य परिषदेच्या उभारणीत लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक, कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करावा अशी भूमिका घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी परिषदेने आपला जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. त्यानुसार पहिला पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ, दुसरा डॉ. चंद्रकांत पाटील, तिसरा ना. धों. महानोर, चौथा प्रा. तु. शं. कुलकर्णी, पाचवा पुरस्कार मधुकरराव मुळे यांना देण्यात आला होता. सहाव्या पुरस्कारासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने वाङ्मय समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारण यांचे साक्षेपी अभ्यासक न्या. नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड केल्याची घोषणा ‘मसाप’चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज सोमवारी केली.

न्या. नरेंद्र चपळगाककर यांचा तरुणपणीच मराठवाडा साहित्य परिषदेशी संबंध आला. तेव्हापासून आजपर्यंत ते साहित्य परिषदेशी जोडलेले आहेत. सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. साहित्य महामंडळावरही त्यांनी परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे. पंचवीसहून अधिक वर्षे ते कार्यकारिणीचे सभासद राहिले आहेत.

2005 मध्ये माजलगाक येथे झालेल्या 26 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. साहित्य परिषदेसाठी त्यांनी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणांचे संपादन मोठय़ा आस्थेने केलेले असून निजाम काळातील मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाची संदर्भमूल्ये असलेली प्रदीर्घ चिकित्सक प्रस्तावना ही या संपादनाची अभ्यासकांना मोठी उपलब्धी आहे. न्या. चपळगाककर यांची मराठी व इंग्रजी मिळून सुमारे 30 पुस्तके प्रसिद्ध आहेत.