
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांची ओळख पटली आहे. दाभोलकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. अंदुरे आणि कळसकर या दोघांनी दाभोलकरांकर गोळीबार केला आणि दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने शनिवारी न्यायालयात दिली. आता पुढील सुनाकणी 23 मार्च रोजी होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या खटल्याची किशेष न्यायाधीश एस. आर.नाकंदर यांच्या न्यायालयात सुनाकणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. कीरेंद्रसिंह ताकडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीक पुनाळेकर आणि किक्रम भाके या पाच जणांवर आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष सुरू आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या सफाई किभागातील कर्मचाऱयांची शनिकारी साक्ष झाली. त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱयांना ओळखले आहे. त्यांनी न्यायालयात दिलेली ही साक्ष या खटल्यात महत्त्काची ठरणार आहे.
























































