
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. काँग्रेससह, तृणमूल काँग्रेस, सपा, बसपा अशा सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची पहिली याद्या जाहीर केली आहे. भाजपची यादी मात्र अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये.
भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी वाराणसीमधून, तर गौतमबुद्धनगरमधून गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील 27 उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर केली आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागांवर विजय मिळवला होता.


























































