टेरर फंडिंगसाठी पाककडून नकली नोटांचा वापर

449

नकली नोटांवर उपाय म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीचा उपाय शोधला; पण आता एवढ्या कालावधीनंतर पाकिस्तानने नव्या नोटांचीही हुबेहूब नक्कल करून या नोटांचा वापर करीत हिंदुस्थानविरुद्ध मोठा कट रचला आहे. टेरर फंडिंगसाठीही पाकिस्तानने नकली नोटा वापरायला सुरुवात केल्याचे समजते. हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांना माहिती मिळाली आहे की, पाकिस्तान 2000 आणि 500 रुपयांच्या हुबेहूब नोटांची तस्करी करत असून या नकली हिंदुस्थानी नोटा दहशतवादी कारवायांसाठीही वापरत आहेत. या नोटा लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या खतरनाक संघटनांपर्यंत पोहोचविण्याचे कामही पाकने सुरू केले आहे. या नोटा इतक्या हुबेहूब आहेत की सहजासहजी कुणाला त्यांचा नकलीपणा ओळखूही येत नाही. याच वर्षी 3 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडे 76.7 दशलक्ष हिंदुस्थानी नकली नोटा सापडल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या