गुजरात दंगलप्रकरणी मोदींना क्लीन चिट

215

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलप्रकरणी आज नानावटी आयोगाचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला आहे. या आयोगाने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. गुजरातमधील ही दंगल पूर्वनियोजित नव्हती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह यांनी विधानसभेत दिली.

गृहमंत्री प्रदीप सिंह यांनी सांगितलं की, ‘‘कोणत्याही माहितीविना तत्कालीन मुख्यमंत्री गोध्रा येथे गेले, असा त्यांच्यावर आरोप होता. हा आरोप आयोगाने फेटाळला आहे. याबाबत सर्व सरकारी यंत्रणांना माहिती होती. गोध्रा स्थानकातच सर्व 59 कारसेवकांच्या मृतदेहांचे विच्छेदन केले होते, असा आरोपही केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर अधिकाऱयांच्या आदेशानुसार शवविच्छेदन करण्यात आले होते असे आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे.’ तत्कालीन मंत्री हरेन पंडय़ा, भरत बारोट, अशोक भट्ट यांची त्यात कसलीही भूमिका स्पष्ट होत नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या अहवालात श्रीकुमार, राहुल शर्मा, संजीव भट्ट यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या