डोनाल्ड ट्रम्प यांचे आमंत्रण नाकारले, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवण आणि चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र मोदींनी ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले. मोदी G7 बैठकीला गेले असताना ट्रम्प यांनी मोदींना फोन करून हे निमंत्रण दिले होते. मात्र महाप्रभूंची धरती ओडिशाला यायचं असल्याने आपण ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारल्याचे मोदी म्हणाले. ओडिशाच्या लोकांचे प्रेम आणि महाप्रभूच्या भक्तीमुळे आपण ओडिशाकडे ओढलो गेल्याचेही ते पुढे म्हणाले. नरेंद्र मोदी सध्या ओडिशाच्या दौऱ्यावर असून एका सभेला संबोधित करताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

कॅनडातील अल्बर्टा प्रांतात तीन दिवसांची G7 शिखर परिषद पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेला पाहुणे राष्ट्र म्हणून उपस्थिती लावली होती. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली.