
कॅनडामध्ये जी-7 परिषदेसाठी गेलो होतो तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. ट्रम्प म्हणाले, कॅनडात आलाच आहात तर अमेरिकेत या वॉशिंग्टनमध्ये एकत्र जेवण करू, चर्चा करू. पण मी नकार दिला, असा किस्सा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात भुवनेश्वर येथील सभेत सांगितला. ट्रम्प यांनी अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले पण मोदी यांनी नियोजित कार्यक्रमामुळे येता येणार नाही असे उत्तर दिल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली होती.