मोदी व ट्रम्पसोबतच्या ‘व्हायरल सेल्फी’तील हा मुलगा कोण? वाचा सविस्तर…

3653

ह्युस्टनमध्ये रविवारी रात्री उशिरा पार पडलेल्या ‘हाऊडी मोदी’ या शानदार सोहळ्यात हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी तब्बल 50 हजारपेक्षा जास्त लोकांनी संबोधित केले. एनआरजी मैदानावर झालेल्या या सोहळ्यातची जगभरात चर्चा झाली. याच दरम्यान सोहळ्यात सहभागी झालेल्या एका मुलाचा फोटो जगभरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

हिंदुस्थानात सगळे काही छान चालले आहे; मोदींनी ट्रम्पना मराठीतून सांगितले

जगातील दोन पॉवरफूल देशांच्या प्रमुखांसोबत (पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्य) या मुलाने सेल्फी घेतला आहे. या सेल्फीमुळे हा मुलगा रातोरात स्टार झाला आहे. हा मुलगा नक्की कोण आहे, त्याचे नाव काय आहे, तो कोणत्या देशाचा आहे याबाबत माहिती मिळवण्यासाठी सर्वच प्रयत्न करताना, चर्चा करताना दिसत आहे.

modi-trump

ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या शानदार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदी आणि ट्रम्प जात असताना काही मुलं त्यांच्या भेटीसाठी पुढे येतात. या मुलांमध्ये सर्वात शेवटी उभा असणारा मुलगा मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करतो. दोन महान देशांचे प्रमुखही आढेवेढे न घेता तयार होतात आणि मुलासोबत हसतमुखाने सेल्फी काढतात.

modi-trump1

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल सेल्फीमधील या मुलाचे नाव सात्विक हेडगे असे आहे. तो कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील रहिवासी आहे. नऊ वर्षाचा सात्विक योगामध्ये माहिर आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीसोबतचा या मुलाचा फोटो ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून व्हाईट हाईसच्या ट्वीटर अकाऊंटवरूनही पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

modi-trump3

आपली प्रतिक्रिया द्या