
आखाती देशनमधील वाढता तणाव आणि इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमानयांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. याबाबत X वर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांनी याबाबत माहिती दिली. या संवादामध्ये प्रादेशिक सुरक्षा, ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या सागरी मार्गांवर विशेष भर देण्यात आला.
या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू होर्मुझची सामुद्रधुनी हा होता. जागतिक तेल पुरवठ्याचा सुमारे २० टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो. इराणने या मार्गावर घातलेल्या निर्बंधांमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी आणि सौदी प्रिन्स यांनी मान्य केले की, नौकानयनाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आणि सागरी व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवणे हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
पंतप्रधान मोदींनी या चर्चेदरम्यान सौदी अरेबियातील ऊर्जा केंद्रांवर आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. “क्षेत्रातील ऊर्जा केंद्रांवरील कोणतेही हल्ले हिंदुस्थान खपवून घेणार नाही,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा फटका शेजारील देशांना बसत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली.
Spoke with Crown Prince and PM of Saudi Arabia, HRH Prince Mohammed bin Salman and discussed the ongoing conflict in West Asia.
I reiterated India’s condemnation of attacks on regional energy infrastructure.
We agreed on the need to ensure freedom of navigation and keeping…
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2026


























































