अखेर नरेंद्र मोदी यांना संविधाना समोर झुकावं लागलच

चारशेपार जागा जिंकून देशाचे संविधान बदलण्याचा भाजपचा डाव होता. भाजप नेत्यांनी तशी जाहीर विधाने केली होती. भाजपला 240 जागांवर रोखत इंडिया आघाडीने हा डाव हाणून पाडला. त्यानंतर मोदींचे वागणे-बोलणे बदलले असून शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये येताच मोदी सर्वात आधी संविधानापुढे झुकले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बैठकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतानाच नितीश मोदींपुढे झुकले आणि त्यांच्या पाया पडले. या लोटांगणामागे नेमके काय गणित आहे याबाबत अनेक तर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.