मोदींची अशीही ‘गटारी’; नाल्यातील गॅसवर चहा बनतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘वर्ल्ड बायोफ्यूल डे’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी एक चहावाला नाल्यातील गॅसवर चहा कसा बनवतो याचा किस्सा सांगितला. यावेळी बायोफ्यूल क्षेत्रातील अनेक तज्ञ उपस्थित होते.

पंतप्रधान काय म्हणाले…

‘‘एक छोटेसे नगर में, नाले के पास कोई चाय का ठेला लेकर के खडा रहता था और चाय बनाकर बेचता था । उसने एक छोटेसे बर्तन को उलटा करके छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गॅस निकलता था वो पाइपलाइन से उसकी चाय के ठेले में ले लिया और उसी गॅस से चाय बनाता था ।’’

ट्विटरवरून विधानाची खिल्ली

गटारांमधून गॅस काढा आणि पकोडे बनवा हे पंतप्रधान मोदींचे ‘रोजगार मॉडेल’ आहे- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

त्यासाठीच सांगितले जाते की, देशाचा पंतप्रधान शिकलेला पाहिजे- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

‘गटर से गॅस’ या संशोधनासाठी मोदींना ‘नोबेल’ पुरस्कार तर दिलाच पाहिजे- रिया कुलकर्णी

एका बाजूला ‘गटर की गॅस’ आणि दुसरीकडे चहा… गंगाधर ही शक्तिमान हैं ।- कुलदीप कादीयान

नाल्यातून गॅस निघतो हे जेव्हा कळले तेव्हापासून भक्तांची गर्दी वाढलीय- आयाज खतरी