मोदींच्या भाषणानंतर काही तासांत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा, म्हणाले…

‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सांगितले नव्हते, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले. हे विधान करून काही तास उलटत नाही तोच अमेरिरकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात आपणच मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे.

ऑपरेशन सिंदूर थांबवायला कोणत्याही नेत्याने सांगितले नाही, 100 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांचे नाव घेतले नाही; मोदींचे बिहारच्या प्रचारसभेतील भाषण लोकसभेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 25 ते 30 वेळा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावा केलेला आहे. हा दावा मोदी सरकारने स्पष्ट शब्दात खोडलेला नाही. मोदींनी लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणातही ट्रम्प यांचा उल्लेख केलेला नाही. त्यात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपणच युद्ध थांबवले असा दावा केल्याने विरोधक याच मुद्द्यावरून मोदी सरकारला संसदेत घेरण्याची शक्यता आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशात युद्ध सुरू झाले होते. हे युद्ध आपणच थांबवले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावरून संसदेतच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले असतानाच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असाच दावा केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘हिंदुस्थान आमचा मित्र आहे. माझ्या विनंतीवरून हिंदुस्थानने युद्ध थांबवले. पाकिस्ताननेही तेच केले. मी अशा प्रकारच्या पाच वेगवेगळ्या युद्धांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. पण मला त्याचे श्रेय मिळणार नाही.

ट्रम्प खोटारडे आहेत हे बोलायची तुमच्यात हिंमत आहे काय? राहुल गांधी यांचा तुफान हल्ला, संसदेत ‘सिंदूर’वरून विरोधकांनी सरकारचा धूर काढला