
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सवुमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणाने केवळ मंत्र्यांच्या प्रतिमेवरच नव्हे, तर शासकीय निवासस्थानांच्या सुरक्षेवर आणि तिथल्या वापराच्या पद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लोकशाही मराठीच्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ पवन यादव नावाच्या एका ट्रान्सवुमनसोबतचा असून, हा प्रकार शासकीय बंगल्यावर घडल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, पवन यादवचा भाऊ रवी यादव यानेच ही बाब चव्हाट्यावर आणली आहे. रवी यादवच्या दाव्यानुसार, पवन हा ट्रान्सवुमन असून तो बड्या लोकांकडून खंडणी उकळण्याचे काम करतो. धक्कादायक बाब म्हणजे, खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी पवनवर यापूर्वीच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
या व्हायरल व्हिडीओमुळे शासकीय निवासस्थानाचा वापर अनैतिक कृत्यांसाठी आणि मद्यपानासाठी केला जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय निवासस्थानावर अशा प्रकारच्या कृत्यांमुळे प्रशासकीय वर्तुळातही मोठी अस्वस्थता पसरली आहे.



























































