नाशिकमध्ये 9444ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिह्यात अवघ्या सात दिवसात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7037 वरून 9444 वर पोहोचली आहे. नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील निफाड, सिन्नर, नाशिक आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या वाढलेली आहे.

नाशिक जिह्यात 27 सप्टेंबर रोजी 24 तासात 1110 इतके नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यानंतर 29 सप्टेंबरला 745, 2 ऑक्टोबरला 1430, तर काल शनिवारी 866 इतक्या नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. 27 सप्टेंबर रोजी जिह्यात उपचार घेत असलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 7037 इतके होते. ही संख्या वाढत-वाढत शनिवारी 9444 वर पोहोचली.

जिह्यात सर्वाधिक 4139 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात 410 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिह्याबाहेरील 117 रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल आहेत. ग्रामीण भागात निफाडला सर्वात जास्त 1084 रुग्णसंख्या आहे. सिन्नर- 828, नाशिक तालुका- 639, मालेगाव तालुका- 357, नांदगाव- 282, दिंडोरी- 276, सटाणा- 255, इगतपुरी- 212, चांदवड- 184, देवळा- 177, कळवण- 164, त्र्यंबकेश्वर- 157, येवला- 104, सुरगाणा- 34 आणि पेठ- 25 अशी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.

मार्चअखेरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत नाशिक जिह्यात एकूण 79 हजार 280 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. उपचाराअंती 68 हजार 409 जण कोरोनामुक्त झाले आहेत.